Wednesday, October 13, 2010

आता कायम सदस्यत्व हवे.

तब्बल एकोणीस वर्षांच्या कालखंडानंतर भारत सुरक्षा समितीचे सदस्यपद भूषवीत आहे. आमसभेत 190 पैकी 187 सदस्यांनी भारताला पाठिंबा दिला. अस्थायी सदस्यपदासाठी झालेले हे उच्चांकी मतदान आहे. ही निश्‍चितच आनंदाची बाब आहे. जागतिक पातळीवर गेल्या काही वर्षांत भारताने बजावलेल्या भूमिकेवर जागतिक समुदायाने उमटवलेली ही मान्यतेची मोहोर आहे.

तो भारताचा अधिकार आहे. सध्या अमेरिका, इंग्लंड, फ़्रान्स, रशिया आणि चीन हे सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य आहेत.भारत लोकसंख्येत चीन खालोखाल आहे. भारत जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. भारताची आर्थिक स्थिती इंग्लंड, फ़्रान्स आणि रशिया पेक्षा उत्तम आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दादा आहे.
भारताने स्वबळावर चांद्रमोहिम हाती घेउन ती पार पाडली आहे. DRDO, इस्त्रो यांचे नाव जगात आदराने घेतले जाते. आर्थिक उदारिकरणानंतर भारतीय उद्योग जागतिक स्तरावर पोचले.

भारत हे एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे. अण्वस्त्रधारी राष्ट्रांनी संबंध तोडल्यावर सुद्धा भारताने कोणासहि अणुतंत्रज्ञान दिले नाही.


भारताचे सैन्य हे नागरी शक्तीच्या ताब्यात आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतीसेनेमध्ये ५०००० पेक्षा अधिक भारतीय सैनिक आहेत. भारताचे धोरण आक्रमक नाही. अमेरिकेने उजाड केलेल्या अफ़गाणिस्तानमध्ये भारत महत्वपुर्ण विकासकामे करत आहे.
मालदीवला लष्करी मदत करुन तेथील बंडाळी भारतीय सैन्याने मोडुन काढली. बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळवुन देताना पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. आशिया खंडात आणि एकुणच जागतिक स्तरावर भारत महत्वपूर्ण भुमिका बजावत आहे.

1 comment:

निखील said...

एक राहील ओ... भारतात $80 किमतीचे toilet paper, $61 चे soap dispensers आणि $125 चे first-aid किट्स वापरले जातात, अमेरिकेचा राष्ट्रपती आणि बिल गेट्स सुध्दा इतक महागड सामान वापरत नसेल